समतोल गुंतवणूक- दीर्घकालीन परतव्याची गुरूकिल्ली

समतोल सांभाळला, कि गोष्टी व्यवस्थित जुळून येतात. एखाद्याला कितीही गोड किंवा तिखट आवडत असलं, तरी फक्त त्याच गोष्टीचा अतिरेक केला तर पुढे त्रास हा ठरलेला. आयुष्याच्या सर्व अंगांमध्ये समतोल सांभाळणारे आपण, आपल्या कष्टाच्या कमाईच्या गुंतवणुकीमध्ये तो पाळतो का?

सर्वसाधारण पणे गुंतवणूक हि चार प्रकारांमध्ये मोडते, स्थावर मालमत्ता, दागदागिने, बँकेच्या एफ डी किंवा रोखे, आणि शेयर मार्केट. बऱ्याच वेळेला असं दिसतं, कि गुंतवणूकदार एक-दोन प्रकारांमध्येच बहुतांश संपत्ती गुंतवून असतात. पण दीर्घकाळाचा विचार करता हे अजिबात योग्य नाही.

अचानक पैश्यांची निकड लागली तर ते उभे करता येतील का? उद्या अति महागाई आली किंवा मंदी आली तर काय? कुठेही पैसे गुंतवताना हे विचार मनात असतातच. आजच्या जागरूक गुंतवणूकदाराला भविष्यातले जे प्रश्न भेडसावताहेत, त्याची उत्तरे ह्या गुंतवणुकींच्या गर्भात दडलेली आहेत.

ह्या प्रश्नांची उत्तरे तज्ञांकडून जाणून घेण्यासाठी जरूर ऐका हे मराठी सादरीकरण – ‘समतोल गुंतवणूक’. भविष्याचे निर्णय घेण्यासाठी आजची अठरा मिनिटे जरूर घालवा, कदाचित हि अठरा मिनिटे तुमची सर्वात उत्तम गुंतवणूक ठरेल.

मराठी सादरीकरण – ‘समतोल गुंतवणूक’

About Multi-Act

Multi-Act was founded in 1997 by two Wharton graduates, to develop an Equity Research capability for their own investments. Today, we employ 50 people who operate out of our offices in Mumbai and Pune and service a range of clients from wealthy families, family business owners to sophisticated investors and capital intermediaries around the globe.

Discover a better way of investing

Know why our clients believe that we help them to not only preserve their valuable capital but also generate more than adequate risk-adjusted returns.

Your Name (required)

Your Email (required)

Phone

reCaptcha (required)

Leave a Reply

two × 1 =